पोलिस लाईन येथे वेगवेगळ्या प्रकारच्या २०० झाडांचे वृक्षारोपण
करमाळा समाचार
ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेता पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी केले आहे.शनिवारी करमाळा येथे पोलीस लाईन या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

याठिकाणी शिसम, चिंच, करंजी, आपटा आदी प्रकारचे 200 झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. सदरची वृक्ष सामाजिक कार्यकर्ते गोपालन संस्थेचे अध्यक्ष श्रेणीक खाटेर, यांनी स्व इच्छेने दिली होती.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर, नगरसेविका संगीता खाटेर, सीमा कोकणे, सोनाली बलदोटा, मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, प्रदीप बलदोटा, पत्रकार संजय शिंदे, सचिन जव्हेरी, प्रणव कोकणे, पंकज कोकणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश भुजबळ, सचिन जगताप, पोलिस उपनिरिक्षक प्रवीण साने, पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.