करमाळासोलापूर जिल्हा

जिंती दूरक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस पाटलांचा सत्कार

करमाळा समाचार दिलीप दंगाणे

जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातुन कोरोना येऊ नये म्हणुन काम पाहिलेल्या पोलिस पाटलांचा सत्कारसह्हाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.

तालुक्यापासून सर्वात लांब पल्ल्याचे 45 किलोमीटर अंतराव असलेले जिंती दूरक्षेत्र अंतर्गत सर्व गावकामगार पोलीस पाटलांना जिंती यांनी कोरोनाच्या काळात रात्रीचा दिवस करून कामकाज पाहिले. त्यामुळे जिंती दूरक्षेत्र अंतर्गत यांच्यातर्फे सर्व गावकामगार पोलीस पाटील यांचा कामाचा गौरव करून सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जिंती दूर क्षेत्राचे ए पी आय प्रकाश भुजबळ म्हणाले की, करमाळा तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण जिंती गावात सापडला होता. त्यावेळेस पूर्ण तालुक्याचे लक्ष जिंती गावती केंद्रित झाले होते. त्या वेळेस प्रत्येक खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कामकाज पाहिले व जिंती गावातील रुग्ण संख्या आटोक्यात आणली. त्यावेळी जिंती गावचे सरपंच संग्राम राजेभोसले, ग्रामविकास अधिकारी पांडव साहेब तसेच महसूल विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका, आशाता, अंगणवाडी सेविका सर्व शिक्षक वर्ग यांनी देखील परिश्रम घेतले.

इथून पुढे असे जागृत राहून थोड्याच कालावधीमध्ये आपण जिंती गाव व जिंती गाव अंतर्गत येणारी सर्व गावांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल आहे. त्यामुळे सर्वांनी इथून मागे जसे सहकार्य केले तसे सहकार्य इथून पुढे ही करावे व आपले गाव मुक्त करावे असे आवाहन जिंती दूरक्षेत्राचे ए पी आय प्रकाश भुजबळ यांनी केले.

यावेळी ए पी आय प्रकाश भुजबळ, हवलदार रणदिवे, पी सी समीर खैरे, पी सी सचिन देशमाने, पी एच कारंडे साहेब, दैनिक सकाळचे पत्रकार संतोष केसकर, पी एन कारंडे व सर्व पोलीस पाटील वर्ग उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE