वीट च्या घटनेत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मृत विवाहीतीच्या भावकीतील एकाला घेतले ताब्यात
करमाळा समाचार
विट येथे झालेल्या विवाहितेचा खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून सदर गुन्ह्याचा कबुली आरोपींनी दिल्याची माहिती मिळत आहे. त्याला सोलापूर व करमाळा पोलिसांच्या संयुक्त कामगिरी मुळे हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

करमाळा तालुक्यातील वीट येथे 30 वर्षीय व्यवस्थेचा शेतातून माघारी येत असताना विवस्त्र अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. त्यानंतर सदरच्या घटनेचा तपास सोलापूर ते पथक तसेच करमाळा पोलीस करत होते. भाग्यश्री गाडे अशी त्या महिलेचे नाव होते. तिच्याच भावकीतील एका इसमावर पोलिसांनी पकड मजबूत केली आहे. त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. नंतर सदरच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळत आहे.

धनसिंग गाडे असे ते युवकाचे नाव असून संशयित म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तपासात पुढील बाबी समोर आल्या आहेत. घटनेच्या दिवशी धनसिंग याची चप्पल त्याच परिसरात आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यानंतर अधिक तपास करत असताना वेगवेगळे खुलासे होत गेले. धनसिंग हा यामध्ये संशयित असून त्याचा पुढील तपास सुरू आहे