कार्यकाळ संपण्यापुर्वीच पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांची बदली ; नवे अधिकारी आज हजर होणार
करमाळा समाचार
करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा विहित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच सांगोला येथे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची नेमणूक करण्यात आली आहे. माने हे नियंत्रण कक्ष या ठिकाणी कार्यरत होते.

करमाळा तालुक्यात मागील काही काळापासून पोलीस निरीक्षक यांच्या कार्यकाल संपण्यापूर्वी होणाऱ्या बदल्यांची परंपरा आजही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी असलेल्या तीन ते चार पोलीस निरीक्षकांच्या अचानक बदल्या या ठिकाणी झालेल्या आपण पाहिले आहेत. याच पद्धतीने पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचीही बदली कार्यकाल संपण्यापूर्वी होत असली तरी यामागे त्यांची विनंती बदली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी स्वतःहून बदलीची विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील काही काळापासून तालुक्यात पोलीस व राजकीय वाद वाढलेला होता. त्यानंतर सदरची बदली तर झाली नाही ना ? यामुळे यात राजकीय हस्तक्षेप आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यांच्या जागी श्री रणजीत माने आज कार्यभार स्वीकारतील तर श्री घुगे हे प्रभारी म्हणून सांगोला पोलीस ठाणे येथे काम पाहतील.