संचालक मंडळ व शेतकऱ्यांचे शिष्ठमंडळ यांची सकारात्मकबैठक ; २५ तारखेवर शिक्कामोर्तब
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत बीला संदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्याजवळ बैठक पार पडली. या बैठकीत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला २५ तारखेपर्यंत मुदत देण्यात आले असून सदर मुदती बाबत आंदोलनकर्ते व संचालक मंडळ दोघांनीही तयारी दर्शवली आहे. सकारात्मक चर्चा पार पडली असून यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याकडूनही पावले उचलली जात असल्याने २५ तारखेपर्यंत बिले मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आजच्या बैठकीला मकाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल
विद्यमान अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय आंदोलनकर्त्यांपैकी प्राध्यापक रामदास झोळ, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे व ऍडव्होकेट राहुल सावंत, रविंद्र गोडगे आदींनी उपस्थिती दर्शवली होती.

आंदोलनकर्त्यासह संचालक मंडळाची बाजू ऐकून घेत जिल्हाधिकारी यांनी दोघात चर्चा घडवून आणली. यातून दोघांचेही समाधान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यामुळे यातून बिले निघून शेतकऱ्यांचे आर्थिक फायदा व्हावा हीच एक अपेक्षा सर्व शेतकरी वर्गाची आहे.