सभापती बंडगर बाबत माजी आमदार पाटील यांचा गौप्यस्फोट ; शिंदे यांच्या भ्रष्टाचारावर भाष्य – रोखठोक पाटील
करमाळा समाचार
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती बंडगर यांच्या माध्यमातून पाटील व बागल युती झाल्याचे दिसून आले. त्यामुळे येणाऱ्या काळात पाटील बागल एकत्र येतील का ? असा प्रश्न विचारल्यानंतर शिवाजीराव बंडगर हे आमचे नाहीतच असा मोठा गोप्यस्पोट यावेळी माजी आमदार नारायण पाटील केल्याने नेमके बंडगर कोणाची हा प्रश्न आता पडू लागला आहे.

जेऊर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नारायण पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करत आमदार शिंदे यांच्याकडून वीस-तीस कोटींचा भ्रष्टाचार झाला नसून शेकडो कोटी चा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे सगळे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचेही या वेळी आमदार पाटील यांनी सांगितले
तर येणार्या काळात कोण कोणासोबत असेल हे सांगू शकत नाही. त्यामुळेच कोणतीही प्रतिक्रिया देणे आता घाईचे ठरेल असेही पाटील यावेळी म्हणाले. शिवाय जेऊर ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांनी एकतर्फी बाजू ऐकून निकाल दिला आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचेही पाटील यांनी बोलून दाखवले. तर याविषयी येत्या काळात खुलासा केला जाईल अशीही माहिती यावेळी पाटील यांनी दिली.
