न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी प्रशांत भुषण यांना एक रुपया दंडाची शिक्षा ; दंड न भरल्यास होऊ शकते मोठी शिक्षा
करमाळा समाचार
न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना एक रुपया दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची ही रक्कम १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिने तुरूंगवास आणि तीन वर्षे वकिली करण्यावर बंदी असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी शिक्षा ठोठावली. त्यात प्रशांत भूषण यांनी १५ सप्टेंबरपर्यंत १ रुपया दंड जमा करावा. दंड जमा न केल्यास तीन महिने तुरूंगवास आणि ३ वर्षे वकिलीवर बंदीच्या शिक्षेचा समावेश आहे.
