करमाळासोलापूर जिल्हा

सोगावचे सरपंचांनी व गावकऱ्यांनी मानले महावितरण कर्मचाऱ्याचे आभार

करमाळा समाचार


आज काल रात्री अपरात्री लाईट चे काम करायचे असल्यास आपण सगळे किती तरी वेळा विचार करतो, पण आपल्यासाठी सदैव सेवेत असणारे गावचे वायरमन हे कधीही न विचार करता गावाच्या लाईन दुरुस्ती साठी झटत असतात. असाच आज सोगाव गावामध्ये प्रकार झाला.

महावितरण चे कर्मचारी श्री अविनाश खेडकर यांची नुकतीच आमच्या गावामध्ये 10 महिन्यापूर्वी पोस्टिंग झाली. कायम सहकार्य करणारे सर्वांशी मनमोकळे पणाने वागणारे आमचे हे परम मित्र. आज गावामधे रात्रीच्या वेळी लाईट गेली असता साहेबांना सरपंच विजय गोडगे यांनी कॉल केला. त्यांना माझी समस्या सांगितली, त्यांनी वेळेचा विलंब न करता पुढील अर्धा तासात गावात आले.

लगेच लाईन फॉल्ट शोधण्यास सुरुवात केली. फॉल्ट काढून ताबडतोब लाईन चालू केली. मी आणि माझ्या गावाच्या वतीने सर्व महावितरण कर्मचारी यांचे आभार मानतो असे गोडगे म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE