कोरोना पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची पत्रकार परिषद ; काय सुरु काय बंद दिली माहीती
करमाळा समाचार – सोलापूर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत नव्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार रात्री कडक संचारबंदी पाहायला मिळणार आहे. तर टेस्टिंग वर ही भर देण्याचे भरणे यांनी सांगितले आहे. तर आता पुन्हा एकदा शाळा, कॉलेज बंद तर स्पर्धा भरवण्यासाठी परवानगी नसणार आहे.

– उद्या 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी

– आज मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी
– कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार
– शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार
– 10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार
– क्रिडांगणावर 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी
– लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा
– Rtpcr टेस्ट वाढविणार
– कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार
– कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य