करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

उद्याचा करमाळा बंद मागे घेण्याचा निर्णय ; ओबीसी समाजाकडुन पुकारला होता बंद

करमाळा समाचार


ओ बी सी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ दि १० रोजी गुरुवारी करमाळा बंदचे निवेदन दिले होते. ते स्थगित करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

ओ बी सी समाज्याचे राजकीय आरक्षण दोन्ही सरकारच्या नाकर्ते पणामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने ओबीसी समाज्यातील जनतेमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी करमाळा शहर दि . १०/०३ /२०२२ रोजी बंद करण्याचा निर्णय सर्व समाज बांधवांनी घेतला होता.

परंतु महाराष्ट्र शासनाने ओबीसी आरक्षण मिळाल्या शिवाय पुढील सर्व निवडणुका सहा महिने घेणार नाही असे सरकारच्या विधी मंडळाकडून ठराव एकमताने झाला आहे त्यामुळे वरील बंदबाबतचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला आहे. करमाळा पोलीस उपविभागिय अधिकारी, करमाळा पोलीस अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा, व्यापारी असोसिशन करमाळा, किराणा भुसार असोसिशन करमाळा, हॉटेल असोसिशन करमाळा, हमाल पचायत करमाळा यांना दिले आहे.

या निवेदनावर शेतकरी संघर्ष समिती नेते दशरथ कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, सरपंच दत्तात्रय आडसुळ, पत्रकार जयंत दळवी, ओबीसी नेते प्रशांत शिंदे आदिजणांच्या सहया आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE