टेस्टींग किट उपलब्ध नसल्याने अभिनव युवा प्रतिष्ठाण कर्जत यांच्या माध्यमातुन खासगी चाचणी
संजय साखरे – प्रतिनिधी
सध्या कोरोनाने थैमान घातले असून कोर्टी प्रा.आ.केंद्रामध्ये कोरोना चाचणी ही कोरोना चाचणी किट उपलब्ध नसल्यामुळे बंद आहे व खासगी लॅबमध्ये आठशे ते हजार रुपये टेस्टींग साठी खर्च येत असल्याने लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे त्यामुळे नागरिक हे लक्षणं असून सुद्धा रोग अंगावर काढत आहेत त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे हेच लक्षात घेऊन सावडी गावातील वाढती रूग्ण संख्या पाहाता चाचण्या करणे गरजेचे होते हेच येथील युवकांनी ओळखून अभिनव युवा प्रतिष्ठाण कर्जत यांच्या माध्यमातुन खासगी चाचणी करण्याचा निश्चय केला.

या चाचणीसाठी सावडी गावातून तसेच पंचक्रोशीमधील लोकांनी हजेरी लावली.अभिनव युवा प्रतिष्ठाण या काळामध्ये माणुसकी जपून जी सहकार्याची भुमिका बजावत आहे ती खरोखरच वाखाण्याजोगी आहे आपल्याला टप्प्या-टप्याने आणखी टेस्ट उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले आहे.आज पन्नास लोकांच्या तपासण्या झाल्या असून यामध्ये सहा लोकं पाॅजिटिव्ह सापडले असून त्यांची प्रकृती प्रथम अवस्थेत असल्यामुळे त्यांना सावडी येथील श्री हिराभारती महाराज कोवीड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.

यावेळी आयोजक अभिजित देशमुख, सरपंच भाऊसाहेब शेळके, उपसरपंच महेंद्र एकाड, राम मचाले, हनुमंत एकाड,सुदाम तळेकर उपस्थित होते. तसेच आणखी दोन दिवसांनंतर आपण रॅपिड अॅंटीजीन टेस्ट घेणार असून करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावडी ग्रामपंचायतीने केले असून हे सेंटर पन्नास बेडचे असून यामध्ये आता सतरा कोरोना रूग्ण आहेत व तेत्तीस बेड रिक्त आहेत हे सेंटर पश्चिम भागातील गावांच्या सर्व नागरिकांसाठी खुले आहे.