उद्या प्रो ॲक्टीव परिक्षा ; 6 मिनिटात द्यावी लागणार शंभर प्रश्नांची उत्तरे
करमाळा समाचार
कमलाई प्रो ॲक्टिव्ह अबॅकस यांच्यावतीने प्रो ऍक्टिव्ह समर नॅशनल कॉम्पिटिशन 2023 ऑनलाइन परीक्षा उद्या सकाळी सात वाजता होणार असून या परीक्षेला तालुक्यातून 62 विद्यार्थी बसले आहेत. केवळ सहा मिनिटांची ही परीक्षा यामध्ये शंभर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

सदरची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे येथे जावे लागत होते, ही अडचण दूर करीत आयोजकांनी सदरची परीक्षा हे करमाळा शहरात आयोजित केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हेलपाटा वाचणार आहे. तर मागील अनुभवानुसार सदरच्या परीक्षेत विद्यार्थी उत्तम कामगिरी करत असून 100 पैकी 95 ते 99 पर्यंत मार्क विद्यार्थी मिळवतात. त्यामुळे उद्या होणाऱ्या परीक्षेकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सदरची परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात असून या परीक्षेच्या निमित्ताने यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील व माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती करमाळा अनिल बदे हे उपस्थित राहणार आहेत.