मोहिते पाटील समर्थक पॅनल प्रमुख सवितादेवी राजेभोसलेंच्या उमेदवारीवर आक्षेप ; तीनला सुनावणी
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्यात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काल मोहिते पाटील समर्थक सवितादेवी राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली मकाईच्या निवडणुकीत संपुर्ण पॅनल दाखल झालेला असताना आता सवितादेवीच्या उमेदवारीवरच आक्षेप घेण्यात आला आहे. त्याच्यावर तीन वाजता सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात असलेल्या शेअरची वाढीव रक्कम ही थकीत असल्याने हा आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे. यावर राजेभोसले यांचे वकील कोणती बाजू मांडतील त्यावर निकाल अवलंबून राहणार आहे.

मकाई निवडणुकीत तुल्यबळ असा विरोधक दिसून येत नसताना सवितादेवी राजेभोसले यांनी संपूर्ण पॅनल उभा करत बागलांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांच्यावर आक्षेप घेतला असला तरी त्यांच्यावतीने बाजु मांडण्याचे काम होत आहे. त्यावर बागल गटाच्या वतीने आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे बऱ्यापैकी आक्षेपात हे महत्वाचे कारण ठरत आहे.

दिनांक 18 रोजी पर्यंत सर्व अर्ज भरून घेण्याची मुदत होती. तर आज सकाळी छानणीला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाने कोणतीही माहिती बाहेर पोहोचणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळे नेमके किती अर्ज बाद होतील हे तीन च्या पुढे उलडणार आहे. पॅनल प्रमुख सवितादेवी राजेभोसले यांच्यावर घेतलेल्या अर्जावर नेमकी सुनावणी दरम्यान काय भूमिका मांडली जाते किंवा त्याला पर्यायी मार्ग काय आहेत का ? याचा उलगडा सुनावणी झाल्यानंतर होईल . पुढे नेमकी काय होतेय याकडे आपले लक्ष लागुन आहे.