करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

उर्वरित पैसे माघारी देण्यावरुन अल्पवयीन मुलासोबत वाद ; वाहका (कंडक्टर) विरोधात गुन्हा दाखल

करमाळा समाचार – विशाल घोलप

अल्पवयीन मुलगा एसटीने प्रवास करीत असताना प्रवासातील उर्वरित १२७ रुपये माघारी देण्याऐवजी त्यालाच उलट सुलट शिवीगाळ करून मुलाची बॅग रस्त्यावर फेकल्या नंतर झालेल्या नुकसानीस व अल्पवयीन मुलाशी उद्धट वागल्या प्रकरणी एसटीच्या वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार २६ जानेवारी रोजी आवाटी ते पिंपरी चिंचवड प्रवासादरम्यान वीट ता. करमाळा येथे घडला आहे. विजय बाबू वाघमारे (वाहक) यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आवाटी येथील अल्पवयीन मुलाने करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार मुलगा हा पिंपरी चिंचवड येथे शिक्षण घेत आहे. २० जानेवारीपासून कॉलेजला सुट्ट्या असल्याने तो गावी आला होता. तर २६ जानेवारी रोजी सुट्ट्या संपल्यामुळे तो पुन्हा माघारी पिंपरी चिंचवड या ठिकाणी जात होता. दरम्यान आवटी येथून परांडाहून पिंपरी चिंचवड येथे जाण्याकरिता एसटीमध्ये बसल्यानंतर सदर एसटी बस(क्रमांक एम एच १४ बी टी १५७१)च्या वाहकाकडून पिंपरी चिंचवडचे तिकीट काढले. यावेळी ३७३ रुपये तिकिटासाठी मुलाने ५०० रुपये दिले.  तर वाहकाने उर्वरित १२७ रुपये तिकिटा मागे लिहून नंतर देतो असे सांगितले.

politics

त्यानंतर सदरची बस वीट येथे आल्यानंतर संबंधित मुलाने वाहकाकडे राहिलेले पैसे मागितले. यावेळी वाहकाने त्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व हुज्जत घालीत मुलाची लॅपटॉप असलेली बॅग ही गाडी बाहेर रस्त्यावर फेकून दिली व मुलास वीट येथील एसटी बस स्टैंड वर खाली उतरवले. यावेळी मुलाने बॅग शोधली व त्यात पाहिले असता लॅपटॉपचे नुकसान झाल्याचे दिसून आले. यानंतर मुलाने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. यावेळी वडील व मुलगा खाजगी गाडीने भिगवण येथे गेले व त्या ठिकाणी त्यांना ती गाडी दिसून आली.

यावेळी डेपो मॅनेजरला भेटून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यांनी संबंधित वाहकाकडून १२७ रुपये परत दिले. त्यानंतर संबंधित मुलाने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, यावरून वाहका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE