राजेंद्र राऊत व सूर्यकांत डिकोळे यांची मंडळ अधिकारीपदी पदोन्नती
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील रावगाव सजाचे तलाठी राजेंद्र राऊत व गुळसडी सजाचे सूर्यकांत डिकोळे यांची नुकतीच मंडळ अधिकारी पदी पदोन्नती झालेली आहे.जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सदर पदोन्नती बाबत आदेश काढलेले आहेत.सोलापूर जिल्ह्य़ातील 29 तलाठी यांना पदोन्नत देण्यात आली असून करमाळा तालुक्यातील या दोन तलाठी यांचा समावेश आहे.

तलाठी राजेंद्र राऊत यांनी मंगळवेढा, माढा व करमाळा येथे तर तलाठी सूर्यकांत डिकोळे यांनी करमाळा व माढा तालूक्यात तलाठी पदावर काम केले आहे. राजेंद राऊत व सूर्यकांत डिकोळे यांचे पदोन्नतीबद्दल तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे, निवडणूक नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार पांडेकर, तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष गौरव कुलकर्णी, सचिव मोहसीन हेड्डे, मंडळ अधिकारी बाबासाहेब गायकवाड, सादिक काझी, संतोष गोसावी, अनिल ठाकर, किरण खारव, रेवणनाथ वळेकर, शंकर केकाण, तलाठी विनोद जवणे, प्रमोद चव्हाण आदींसह सर्व तलाठी बांधवांनी आनंद व्यक्त करून अभिनंदनासह पुढील प्रशासकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.