करमाळासोलापूर जिल्हा

मला रिझल्ट पाहिजे ; आढावा बैठकीत आ. शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना

प्रतिनिधी – अमोल जांभळे

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदानी असलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. 15 जुलै 2022 रोजी आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा येथे संपन्न झाली.

या बैठकीसाठी दहिगाव योजना सिव्हिल विभागाचे उपअभियंता अवताडे साहेब , शाखा अभियंता कांबळे साहेब, हायड्रो विभागाचे कार्यकारी अभियंता चौकडे, उपअभीयंता तरंगे व मेकॅनिकल विभागाचे उपअभियंता गोरे यांच्याबरोबरच माजी जि. प. सदस्य विलास राऊत, पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव ,स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, प्रवीण शिंदे गुरुजी, सुरज ढेरे आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये दहिगाव योजनेच्या दोन्हीही पंपगृहातील सद्यस्थिती, पंपांची सुरू असलेली कामे व काम पूर्ण होणे बाबतचा कालावधी, निधी बाबतच्या अडचणी या विषयावरती प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी बोलताना आ. संजयमामा शिंदे म्हणाले की, सर्व विभागांचा समन्वय साधून योग्य पद्धतीने काम करा. मला रिझल्ट द्या. महावितरण विभाग , हायड्रो विभाग, मेकॅनिकल विभाग व सिव्हील विभाग या चारही विभागाच्या समन्वयातूनच ही योजना योग्य पद्धतीने चालेल. प्रत्येक विभागाच्या ज्या काही अडचणी असतील त्या वरिष्ठ पातळीवरती सोडवण्यासाठी आपण लवकरच बैठक घेऊ व त्या अडचणी सोडवू.

*ठाकरे शिंदे भेटीमागे सय्यद यांना दोन भाजपा नेत्यांचे सहकार्य ; शिंदे ठाकरे भेटीचे संकेत*

ठाकरे शिंदे भेटीमागे सय्यद यांना दोन भाजपा नेत्यांचे सहकार्य ; शिंदे ठाकरे भेटीचे संकेत

सद्यस्थितीमध्ये उजनी धरणामध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्यामुळे लवकरच ओव्हरफ्लो आवर्तन सुरू करण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना तातडीने करा, दरवर्षी उन्हाळी आवर्तनाला अडचणी येत असतात त्यामुळे या ओव्हर फ्लो आवर्तनापासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करा अशा सूचना आ. संजयमामा शिंदे यांनी अधिकारी मंडळींना दिल्या.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE