करमाळासोलापूर जिल्हा

मुलींनी तक्रारी करण्यासाठी पुढे येण्यासाठी पीएसआय साने यांनी सांगितला नवा पर्याय

समाचार टीम

सायबर जागरूकता दिनानिमित्त आज दिनांक 06/10/2022 रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रवीण साने यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे मुलींना निर्भया पथका ची माहिती दिली. तसेच सायबर गुन्हे, निर्भया पथका संदर्भात मार्गदर्शन केले.

साने यांनी सध्याच्या युगामध्ये मोबाईल वापराबाबतचे फायदे तसेच दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. तसेच इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून देखील गुन्हेगारी सध्या होत असले बाबत सांगितले. त्याबाबत मुलींनी घ्यावयाची दक्षता. तसेच ऑनलाइन फसवणुक बाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुलींनी भयमुक्त वातावरणामध्ये शिक्षण घेतले पाहिजे. त्याचबरोबर मुलींनी कोणालाही न घाबरता व न लाजता धाडसी निर्णय घेऊन साहसी होण्याचे महत्त्व पटवून दिले.

काही विद्यार्थिनी या बोलण्यासाठी घाबरतात अशा मुलींनी शाळेत ठेवलेल्या तक्रार पेटीत तक्रार लिहून टाकावी. तुमचे शिक्षकांनी आम्हाला कळवल्यावर आम्ही त्यावर लगेच ॲक्शन घेऊन संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करू असे मत व्यक्त केले.

ads

तसेच पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाडुळे यांनी निर्भया पथक स्थापनेची गरज का भासली, याबाबत मार्गदर्शन केले. करमाळा शहरांमध्ये कॉलेजला ग्रामीण भागातून बरेचशा मुली बस ने येऊन जाऊन करतात त्यावेळेस मुलींना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते. काही छेडछाडी संदर्भात तसेच महिला सुरक्षा संदर्भात काही अडचणी असल्यास निर्भया पथक करमाळा यांच्याशी संपर्क साधण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. प्रदीप मोहिते सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील सर. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते PSI प्रवीण साने . सदर कार्यक्रमासाठी उपस्थित उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, एस.टी. शिंदे , निर्भया पथकाचे पोलीस नाईक शिवदास गर्जे, पोलीस नाईक गणेश गायकवाड , पो कॉ संभाजी पवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती सुवर्णा कांबळे यांनी केले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE