करमाळासोलापूर जिल्हा

दुख :द बातमी – शिवक्रांती संघाचा वाघ रतिराज जानरावचा उपचारा दरम्यान मृत्यू

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील तहसिल ऑफिस येथे मदतनीस म्हणून कार्यरत असलेले रतिराज जानराव यांच्यावर काही दिवसांपासून सोलापूर येथे मेंदू वरील आजारासंबधी उपचार सुरू होते. आज अखेर त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. जानराव हे उत्तम खेळाडू व मनमिळावू असे मित्र असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रतिराज किसन जानराव यांनी शिवक्रांती संघात खेळत असताना तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र आपला गोलंदाजीच्या माध्यमातून दबदबा निर्माण केला होता. रतिराज सारखा गोलंदाज समोर आल्यानंतर अनेकांची धडकी भरवणारा हा गोलंदाज आज आपल्यात नाही हे ऐकून क्रिकेट प्रेमी सह मित्र मंडळ मध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

ऑगस्ट महिन्यात कार्यालयीन कामकाजा दरम्यान रतिराज हे चक्कर येऊन पडले. त्यावेळी त्यांना सोलापूर येथे तात्काळ हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून मेंदू ला सूज असल्याचे सांगितल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही काळ तब्येतीत सुधारणा होत असल्याचे वाटत होते. परंतु आज अखेर त्यांची प्राणजोत मावळली आहे.

रतिराज हे क्रिकेट प्रेमींसह तहसील परिसरातही अतिशय लोकप्रिय असे व्यक्तिमत्व होते. आपण ज्या ठिकाणी काम करतो. त्या ठिकाणी शंभर टक्के प्रतिसाद देणे हे रतिराजचे वैशिष्ट्य होते. अखेरच्या दिवसापर्यंत रतिराजने कामाशी एकनिष्ठ राहून वरिष्ठांना कायम खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. रतिराज गेल्यानंतर शिवक्रांतीसह सर्वच क्रिकेट प्रेमींनी दुःख व्यक्त केले आहे.

रतिराजचे आई -वडील भाजी व फळ विक्रेत्या असून अतिशय त्रास सहन करत त्यांनी घरातील दवाखान्याचा खर्च उचलला आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती संपूर्ण गेली तरी आपल्या मुलाला जीवदान मिळालं पाहिजे या आशेने ते प्रयत्न करत होते. पण त्यांचे प्रयत्नांना यश आले नाही. रतिराज नंतर पत्नी, आई, वडील, मुली असा संसार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE