महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा ; करमाळ्यात भोपळा दाखवत केला निषेध
करमाळा समाचार
देशाच्या 2024 मधील चालू अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नाला निधीपासून वंचित ठेवल्याबद्दल करमाळ्यात आज राष्ट्रवादीच्या वतीने भोपळा दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आला असल्याचे मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी पक्षातील व संघटनेतील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. यावेळी आंध्र प्रदेश व बिहार या दोन राज्यांना सुमारे एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली. परंतु देशात सर्वाधिक उत्पन्न विविध कार्याच्या माध्यमातून जमा करून केंद्र शासनाच्या तिजोरीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्राला मात्र अगदी नाममात्र निधी देऊन केंद्र शासनाने अन्याय केला आहे.

देशाचे नेते शरदचंद्र पवार तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात लोकसभेला जी आघाडी घेतली त्याचा राग मनात धरून केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे असेही यावेळी पाटील म्हणाले. अशा शासनाचा महाराष्ट्रात निषेध व्यक्त करताना विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी संतोष वारे, देवानंद बागल, शेखर गाडे, अतुल पाटील, राजाभाऊ कदम, धुळा भाऊ कोकरे, दत्तात्रय सरडे,गहीनीनाथ ननवरे, डॉ. अमोल दुरंदे, संजय फरतडे, दत्तात्रय देशमुख, सचिन नलवडे, गणेश पाटील, वैभव पाटील, राहुल गोडगे, राहुल बागल, राहुल उरमुडे, आरशाण पठाण, श्रीराज घाडगे, संजय शिंदे, प्रताप पारेकर, विशाल तकिक, विनोद गरड, विलास मुळे, बाळासाहेब पवार, संदीप मारकड, श्रीमान चौधरी, महादेव मोरे, चंद्रशेखर पाटील, श्रीकांत मारकड, राजेंद्र भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.