अवघ्या दोन मिनिटात पंजाब केसरीला नमवले ; सिकंदर विजेता
जिंती- दिलीप दंगाणे
जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे पंचाषष्ठी खंडेरायात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानचे आयोजन जय मल्हार तालीम वस्ताद दत्ता गायकवाड यांनी केले होते. या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी पैलवान शंकी पंजाब अशी झाली या कुस्ती मैदान मध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान सिकिंदर शेख यांनी अवघ्या दोन मिनिटात पंजाब केसरी पैलवान शंकी पंजाब याला बॅक थुरो या डावावरती चिटपट करून विजय मिळवला.
या कुस्ती मैदानसाठी पुणे, कोल्हापूर, इंदापूर, इचलकरंजी, बारामती, कर्जत, जेऊर, कंदर, भिगवन या गावातून कुस्ती मल्ल कुस्ती मैदान साठी आले होते. या कुस्ती मैदानामध्ये लहान मोठ्या अशा एकूण १४० कुस्त्या झाल्या. त्यामध्ये एक महिना अगोदरच पोस्टर वरती ६० कुस्त्या जोडल्या होत्या. उर्वरित राहिलेल्या ८० कुस्त्या मैदानादिवशी सकाळी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत मैदानावरती १०० रुपयांपासून पाच हजार रुपयापर्यंत नेमण्यात आल्या होत्या.
या कुस्ती मैदान साठी राजकीय सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा फेटा व श्रीफळ देऊन मानसन्मान जय मल्हार तालीम चे वस्ताद दत्ता गायकवाड मित्रपरिवाराने केला. तसेच आलेल्या सर्व कुस्ती प्रेमींसाठी महाप्रसादाचे आयोजन खंडेराया मंदिरामध्ये करण्यात आले होते. तर कुस्ती निवेदक म्हणून सुप्रसिद्ध निवेदक भागवत बारामती व प्रवीण ठवरे इंदापूर यांनी काम पाहिले. तर या कुस्ती मैदान साठी जय मल्हार तालीम कुस्ती कोच अजय कोथिंबीरे आणि पंचक्रोशीतील वस्ताद मंडळींनी परिश्रम घेतले.