करमाळ्यात जुगार अड्ड्यावर छापा ; चाळीस पेक्षा जुगारी ताब्यात
करमाळा समाचार
करमाळा शहरात कर्जत करमाळा रस्त्यावर स्वागत ढाब्याजवळ पोलिसांनी छापा टाकून 41 जणांना ताब्यात घेतले आहे तर यावेळी मोबाईल गाडी व रोख रकमेसह सात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे
आरोपी – पंडित अर्जुन पवार व इतर 40 लोक

यावेळी पंडीत अर्जुन पवार सह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दिनांक 18 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोलापूर येथील पोलीस सापळा रचून स्वागत ढाब्याजवळ पोहचले. यावेळी तब्बल 41 जण आत मध्ये मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. यावेळी त्यांच्याकडून 7 लाख रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास पोहेकाँ/ मदभावी यांचेकडे दिला आहे .