करमाळासोलापूर जिल्हा

कै जगताप यांच्या पाऊलावर पाऊल टाकुन पुढील काळात जनतेची सेवा करणार – चिंतामणी जगताप

करमाळा-

देशभक्त कै. नामदेवरावजी जगताप यांची आज असणाऱ्या पुण्यतिथी निमित्ताने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील त्यांच्या पुतळ्याचे पुजन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी (दादा) नामदेवराव जगताप यांनी केले.यावेळी करमाळा नगर पालिकेचे माजी नगरसेवक राहुल (भैय्या)जगताप उपस्थित होते.यावेळी कै.नामदेवरावजी जगताप यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कै.नामदेवरावजी जगताप यांनी करमाळा तालुक्यासाठी दिलेले मोठे योगदान, त्यांनी घालुन दिलेले आदर्श, शिकवण याच पाऊलावर पाऊल टाकुन पुढील काळात जनतेची सेवा करणार असल्याचे प्रतिपादन श्री चिंतामणी (दादा) जगताप यांनी केले.

ज्या पध्दतीने साहेबांनी सुतारकाम करण्यापासुन ते यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे विश्वासु खंदे समर्थक असा प्रवास केला. हा प्रवास करत असताना त्यांनाही अनंत अडचणीचा सामना करावा लागला.परंतु न डगमगता त्यांनी हा खडतर प्रवास पार केला आणि करमाळा तालुक्याच्या विकासासाठी अनेक मोठे प्रकल्प, योजना, तसेच शालेय संस्था उभ्या केल्या. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आमच्या तीन्ही भावांची वाटचाल असणार असल्याचे शेवटी श्री चिंतामणी दादा जगताप यांनी सांगितले .

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप,योगेश राखुंडे,सुजय जगताप,उत्तरेश्वर सावंत,सचिन कटारिया,अमोल पवार,दिपक पडवळे, नितीन चोपडे,बबलु चिंचकर,आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE