राजुरीचे सुपुत्र अतिरिक्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास हरिहर यांचे निधन
करमाळा समाचार
राजुरी ता. करमाळा येथील श्री कैलास सुभिदार हरिहर (वय ५१) यांचे दुःखद निधन झाले आहे. ते करकंब पोलीस स्टेशन पंढरपूर येथे अतिरिक्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस होते. हरिहर यांना ११ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करकंब पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असताना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना प्राथमिक उपचाराकरता जगताप हॉस्पिटल करकंब येथे दाखल करून पुढील उपचाराकरता सी.एन.एस. हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले होते.

याठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू असताना शनिवारी दि. १० रोजी साडेचार वाजता सी.एन.एस. हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई ,वडील, दोन भाऊ असा परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांचा अंत्यविधी मूळ गावी राजुरी येथे रविवारी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात होणार आहे.
