वाचकांची डायरी … हिसरे येथील कवियत्री राजेश्वरी यांची कवीता
कवितेचे नाव = वेगळं काही
कधीच नव्हे तो भाव टोमॅटोला आलाय,
न्यूज चॅनेल आणि पेपरला नुसता टोमॅटोच दाखवलाय.

तुमच्या पोटात दुखत असेल तर टोमॅटो खाऊ नका,
पण शेतकऱ्याला दोष देऊ नका.

बारा लाखाची कोथिंबीर खूप गाजली
एक रुपयाला विकलेली पेंढी कोणी नाही दाखवली,
ऊस जगवायला तर रातभर डोळ फोडतोय
तवा कुठं हा हिरवागार डोलताना दिसतोय.
कारखाने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढतात,
उसाचे बिल सहा महिने लांबवतात.
म्हणून शेतकऱ्यांनी पिकात बदल करावेत,
ऊस सोडून थोडं वेगळीकडे वळावेत.
स्ट्रॉबेरी ,हळद, यांचे उत्पादन होते आपल्या भागात
रामफळ, पेरू, द्राक्षे ही दिसू लागलेत रानात,
कुणावरही अवलंबून न राहता व्यवसायिक बनावे
काहीतरी वेगळं करण्याचे विचार मनात धरावे.
– राजेश्वरी जगदाळे
मुक्काम पोस्ट हिसरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर
शिक्षण= टी वाय बी ए बी एड