करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाला दिलासा

करमाळा समाचार

तत्कालीन ग्रामसेवक अधिकारी अंगद लटके व तत्कालीन सरपंच प्रेमा जगताप यांनी संगणमत करून देवळाली ग्रामपंचायतीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार करून ९६ लाख ६५ हजार ८५८ रुपयाचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळाला असून उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. सदरचा अपहार २४ फेब्रुवारी २०१२ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान झाला असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यावरून काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देवळाली ग्रामपंचायत कामामध्ये अनियमितता व गैरव्यावहार प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात भादवी कलम ४२०, ४०६ व ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तेव्हा ग्रामसेवक व सरपंच यांनी अटकपूर्व जमीन मिळणेकामी बार्शी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदरचा अर्ज बार्शी न्यायालयाने दि.१८ जुन रोजी नामंजूर केलेला होता. तेव्हा त्यावर ग्रामसेवक अंगद लटके व सरपंच जगताप यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे अटक पूर्व जमीन मिळणेकामी अर्ज दाखल केला होता.

politics

सदरचा अर्ज मा.उच्च न्यायालयाने तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश देऊन तूर्तास मंजूर केला आहे. तेव्हा ग्रामसेवक अंगद लटके यांच्या वतीने ॲड.सचिन देवकर व अँड विनोद चौधरी यांनी काम पाहिले तर सरकारच्या वतीने ॲड प्रशांत जाधव यांनी पहिले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE