बारामती ॲग्रो कडुन शेतकऱ्यांना दिलासा ; उर्वरीत रक्कम उद्या जमा होणार
दिलीप दंगाणे – जिंती
बारामती ॲग्रो कारखान्याने सुरुवातीचे तेवीसशे रुपये दिल्यानंतर उर्वरित दोनशे पन्नास रुपयांचा हप्ता उद्या दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी जमा होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली आहे. सदर चा कारखानाला ऊस घातल्यानंतर एक महिन्याच्या आतच 2300रुपयांचा हप्ता जमा झाला होता.


बारामती ॲग्रो कारखान्याच्या एफ आर पी 2538 रुपये प्रति टन होते. त्यापैकी सुरुवातीलाच 2300 रुपये दिला होता. तर उर्वरित रक्कम उद्या जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तालुक्यातील कारखान्याची परिस्थिती पाहता बारामती ॲग्रो कारखान्याकडे ऊस पाठवण्याची तयारी दर्शवली होती. त्याचा मोबदला मिळत असल्याने बारामती ॲग्रो सध्या शेतकऱ्यांच्या पसंतीचा कारखाना ठरत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने सध्या अडचणीत सापडलेल्या आहेत. त्यात करमाळा तालुक्यातील कारखान्यांचा ही समावेश आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना तर यावेळीही चालू होऊ शकणार नाही. तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत आहे अशा परिस्थितीत तालुक्यापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेला बारामती ऍग्रो कारखाना उसाला भावही देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
कारखाना 15 ऑक्टोबरला चालू होणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एफ आर पी चा प्रश्न मोठा चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये जो निर्णय होईल या निर्णया प्रमाणे सर्व खातेदारांना एफ आर पी ची रक्कम मिळेल. तरी शेतकरी बांधवांनी बाबत चिंताग्रस्त होऊ नये. शेतकऱ्यांचे हित हेच आमचे हित असेल
-बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष (आबा) गुळवे.