करमाळासोलापूर जिल्हा

मुसळधार पावसात शेतकऱ्याचा मृत्यु ; शेतातुन घरी जात असताना झाला अपघात

करमाळा समाचार 


गुरुवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने हिंगणी ता करमाळा येथील माळरानावरील वगळीत मोटरसायकल पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव सुनील गुलाब बाबर (वय 45) असे आहे.

याबाबत माहिती अशी की येथील शेतकरी सुनील बाबर हे आपली उजनी जलाशयावरील शेतीचा शेतीपंप बंद करून आपल्या वस्तीकडे जात असताना यावेळी माळावरील माळावरून जाताना त्यांची मोटारसायकल वगळीत घसरून पडली. यावेळी पाऊस झाल्याने पाणी वाहत होते मोटरसायकल अंगावर पडल्याने त्यांची डोक्याला मार लागल्याने त्यांना ओरडताही येत नव्हते.

*BREAKING NEWS – मनोहरमामा भोसलेची तब्बेत बिघडली ; पुढील उपचारासाठी पाठवले*
https://karmalasamachar.com/manoharmama-bhosles-condition-worsened-sent-for-further-treatment/

त्यातच परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या वगळीतून जोरदार पाणी वाहत होते हे पाणी मोटर सायकल खाली अडकलेल्या बाबर यांच्या नाकातोंडात जाऊन निपचीत पडले. पाऊस कमी झाल्यानंतर शेतमजूर महिलांनी मोटरसायकल पडल्याचे पाहिले व त्यांनी मोटरसायकल बाजूला केली असता मोटरसायकल खाली बाबर त्यांना दिसले. त्यांनी ही बातमी गावात सांगताच गावातील तरुणांनी बाबर यांना केतूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दहावीत  मुलगा, बारावीत  मुलगी, असा परिवार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE