कोरोनाकाळात करमाळ्याला शिस्त शिकवणाऱ्या मुख्याधिकारी मॅडमची बदली
करमाळा समाचार
कोरोनाकाळात अतिशय उत्तम काम केलेल्या श्रीमती वीणा पवार मुख्याधिकारी करमाळा यांची नुकतीच वैराग नगरपंचायत या ठिकाणी मुख्याधिकारी पदी नियुक्ती झालेली आहे. यासंदर्भातचे आदेश अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी दिले आहे. तर करमाळा नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार अद्यापही विना पवार यांच्याकडे राहणार आहे.


कोरोना काळात महिला असूनही पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही अधिक जोमाने काम करून करमाळ्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यामुळे गावातील प्रत्येक गल्ली-बोळात विना पवार या नावाचा दबदबा कायम होता. आजही त्यांच्या नावाने सर्वत्र शिस्तीचे पालन केले जाते.
कोरोना पादुर्भाव वाढीच्या दरम्यान त्यांची बदली होतेय. दोन नगरपरिषदेचा कार्यभार त्यांच्यावर पडतोय. त्यामुळे आता करमाळा तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांच्याकडून कामाची कोणती योजना आखली जाते याकडेही लक्ष लागून राहील. विना पवार यांच्यानंतर पूर्णवेळ मुख्य अधिकारी करमाळा नगर परिषदेला मिळाल्यास कोरोना आटोक्यात आणण्यास सहकार्य होईल. त्यामुळे पूर्ण वेळ मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषदेला आवश्यक आहे.