पंचायत समीती बारा जागांचे आरक्षण जाहीर ; पांडे व रावगाव अनुसूचित जाती साठी राखीव
करमाळा – विशाल नाना घोलप
करमाळा पंचायत समिती आरक्षण प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यामध्ये 12 गणांची आरक्षण जाहीर झाले आहे. रावगाव, पांडे अनुसूचित जाती साठी तर वीट, उमरड, केम नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित झाला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंजली मुरोड व तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी काम पाहिले.

करमाळा पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्यानंतर करमाळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले.
यावेळी
रावगाव – अनुसूचित जाती महिला
पांडे- अनुसूचित जाती
हिसरे – सर्वसाधारण
वीट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कोर्टी- सर्वसाधारण
केत्तुर – सर्वसाधारण
चिखलठाण- सर्वसाधारण महिला
उमरड- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जेऊर – सर्वसाधारण महिला वांगी (१) – सर्वसाधारण महिला साडे – सर्वसाधारण
केम- नागरिकांचा मागास प्रवर्ग

