करमाळासोलापूर जिल्हा

महसूल विभागाची अवैध रेती तस्करावर कारवाई;तीन यांत्रिक बोटी खोल पाण्यात बुडवून नष्ट

करमाळा समाचार 

मौजे ढोकरी येथील उजनी जलाशय परिसरात भागवत पाटील यांचे वस्ती नजिक अनाधिकृतपणे वाळू उपसा व वाहतूक करणा-या तीन यांत्रिक बोटी वरती महसूल विभागाच्या पथकाने धाडसी कारवाई केली आहे.सदर ठिकाणी 3 बोटी व 3 सक्शन बोटी अनाधिकृत पणे वाळू उपसा करताना दिसून आल्या त्यांना रेती उत्खनन करताना पकडण्यात आले परंतू त्यातील 1 बोट अंधाराचा फायदा घेवून पाण्यात पळवून नेण्यात आली सदर ठिकाणी 40 लाख रु चा मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई तहसीलदार समीर माने यांचे नेतृत्वाखालील पथकात व उपस्थित करण्यात आली.सदर पथकामध्ये निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव,महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे,मंडळ अधिकारी किरण खारव,रेवणनाथ वळेकर,तलाठी उमेश बनसोडे,मोहसिन हेड्डे,आनंदा डोणे,साईनाथ आडगटाळे,संजय शेटे,बाळासाहेब कांबळे कोतवाल नितीन हत्तीकट ,पोलीस पाटील अभिजीत वळसे यांचेसह पोलीस कॉन्स्टेबल महेश बचुटे यांचा समावेश होता.सदरच्या धाडसी कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून त्यांच्यामध्ये या कारवाई मुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरची कारवाई करत असताना त्याठिकाणी झारखंड राज्यातील इमरान शेख,हानिफ शेख,नासीर शेख,कलू शेख हे कामगार आढळून आले.त्यांना पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरील बोटी या विकास देवकर,तेजस सोनवणे,कुणाल खडके,गणेश लोंढे,बीजू साळुंके,गणेश इसगुडे सर्वजण रा.इंदापूर ता.इंदापूर जि.पुणे येथील रहिवाशी यांच्या असल्याचे सदर कामगारांनी सांगितले.सर्व कामगार व बोटी मालक यांचेवर क 379 353 439 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करणेचे काम मंडळ अधिकारी किरण खारव करत आहेत.गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरू आहे.

ads

उजनी जलाशय परिसरात होणारा अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करणे करणेसाठी विवीध पथके नेमली असून सदर पथके तालुक्यात सर्व ठिकाणी गस्त घालणार आहेत.यासंबंधी प्रत्यक्ष सहभागी असणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– समीर माने
तहसीलदार करमाळा

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE