करमाळासोलापूर शहर

या गटातुन त्या गटात घेण्यासाठी राष्ट्रवादीचा वापर ; जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या निवडीवर तालुक्यातील पदाधिकारी नाराज

करमाळा समाचार

करमाळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाहीर केल्यानंतर निवड करत असताना पक्षाच्या अडचणी काळात पक्षाचे काम करत पक्ष मजबूत करण्याची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून निवडी करण्यात आल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तालुका अध्यक्ष पदासाठी मुलाखती दिलेल्या ७ सदस्या पैकी ६ जणांनी तसेच तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत साखरे यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे पत्र दिले असताना देखील जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मनमानी करत तालुकाअध्यक्ष पदासाठी मुलाखतीस न आलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काडीमात्र संबध नसलेल्या लोकांची करमाळा तालुकाअध्यक्ष व तालुका कार्याध्यक्ष निवडी केल्याने नाराजीचा सूर आणखीनच वाढल्याचे चित्र दिसत आहे.

महेश काळे यांना जिल्हा उपाध्यक्ष पदावरून दूर करत केवळ जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त करून पक्षाच्या सोबत कायम निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या सोबत असणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला संधी न देता केवळ पक्ष सत्तेत असल्याने इतर गटातील कार्यकर्त्यांनी पद मिळवून घेतली असल्याच चित्र दिसत आहे. याबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता या निवडी बाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांशी भेट घेऊन सर्व गोष्टी कानावर घालणार असल्याचे सांगितले . यानंतरही न्याय न मिळाल्यास थेट पवार साहेबांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडणार असल्याचं निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सांगितले.

युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एकमताने निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून श्रीकांत साखरे यांच्या नावाची शिफारस केली असताना देखील जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मनमानी करत निष्ठावंताना डावलल आहे. तालुक्यातील एका गटातून दुसऱ्या गटात प्रवेश करण्याच्या अटीवर राष्ट्रवादीच्या पदाचा वापर करून त्या पदाचा बळी दिला गेला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून भलत्याच लोकांच्या निवडी झाल्याने वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे.
महेश काळे पाटील.
माजी युवक जिल्हा उपाध्यक्ष

मोठे नेते पक्ष सोडून गेल्यानंतर राहिलेल्या मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्ष जिवंत ठेवला,आजवर कुठलंही पद न घेता पक्षाचे निष्ठेने काम करत असल्याने तसेच राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याने तालुकाध्यक्ष पदी निवड होईल अशी अपेक्षा होती कुवत असताना ती न झाल्याने नाराज असणं स्वाभाविक आहे.
श्रीकांत साखरे
युवक कार्यकर्ता

पक्ष अडचणीत असताना ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासोबत राहण्याची भूमिका घेतली त्यांना मानाचं स्थान देण्यात यावे तसेच पदवाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जावी असे पक्षाचे वरिष्ठ नेते सांगून देखील आम्हालाच डावलून पक्षाचे साधे सदस्य नसणाऱ्यांना कशी काय संधी दिली हे अनाकलनीय आहे.
सचिन नलवडे .
कार्याध्यक्ष किसान सेल

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदासाठी मी स्वतःही इच्छुक होतो.परंतु निष्ठावंत सोडून इतरांना संधी मिळत असल्याचे पाहून नगरसेवक म्हणून काम करत असल्याने पक्ष्याच्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहून श्रीकांत साखरे यांच्या नावाला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला होता.परंतु निवडी करताना निष्ठावंताना डावल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
अतुल फंड नगरसेवक

आज पक्ष सत्तेत आहे म्हणून काही मंडळी पक्ष्याच्या सोबत असल्याचे भासवून वशिलेबाजी करून पद मिळवत असतील तर हे दुर्दैवी आहे.सत्ता गेल्याबरोबर ही मंडळी पुन्हा पक्षाला वाऱ्यावर सोडून देणार हे नक्की.
चंद्रकांत जगदाळे
युवक कार्यकर्ता.

राष्ट्रवादीच्या पदांची वाटप करत स्वतःचा गट वाढवण्याचे काम आजचे पदाधिकारी करत आहेत मुळात पक्षाच्या सोबत कधीच नसणारी मंडळी पदावर नेमली कशी जातात याची माहिती आम्ही प्रदेश पातळीवर देणार आहोत.
धनंजय ढेरे पाटील
माजी अध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE