आवाटी येथे पश्चिम महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेची आढावा बैठक व विविध जिल्हा, तालुका, शहर नियुक्ती संपन्न
करमाळा समाचार
ईद ए मिलादुन्नबी व दीपावली निमित्त आवाटी येथे मा. नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व विविध जिल्हा, तालुका, शहराची निवड करण्यात आली व तसेच संघटनेच्या बोर्डाचे उदघाटन करण्यात आले . यामध्ये सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे समाजासाठी नेहमी धडपड करणारे समाजाचे सेवक यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी समीर पठाण कुक्कडगाव यांची परंडा ग्रामीण तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट,हुसेन शेख परंडा ग्रामीण तालुका उपअध्यक्ष मुस्लिम फ्रंट, सद्दाम तांबोळी परंडा शहर कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट , शोयब मुजावर शहर उपाध्यक्ष परंडा,जुम्मा सय्यद कव्हे अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, पैलवान कलीम मुलानी रोपळे अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, पदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे असे संघटनेच्या वतीने त्याना सांगण्यात आले.

यावेळी शाहबुद्दीन शेख प्रदेश कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट ,रफीक मुल्ला सर प्रवक्ते, मजहर खान साहब पुणे, आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, आतिक शेख सरपंच शेखापुर, रईस मुजावर महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष, बाबा भाई शेख सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष, अनवर बागवान बार्शी तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट,पैलवान सुनिल जाधव कुस्ती महाराष्ट्र चैम्पियन, मुर्तजा सय्यद परंडा तालुका अध्यक्ष, इरफान सौदागर परंडा शहर अध्यक्ष, राजु भाई उस्मान आवाटी उप सरपंच,हादी मुखेर उस्मानाबाद जिल्हा उपअध्यक्ष, मोईन शेख भुम बार्शी, वसिम तांबोळी सोनारी सर्कल प्रमुख, आदी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे अयोजन रफीक खान करमाळा तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट,राजु उस्मान खान, कदीर पटेल, अॅड आलीम पठान, आसिफ खान, वसिम शेख, मुजीब पटेल बाबु मुलानी यांनी केले होते.