करमाळ्यात खासदारांच्या उपस्थितीत अहमदनगर रस्त्याचा आढावा ; शेतकऱ्यांचा संताप
करमाळा समाचार
करमाळा पंचायत समिती येथे अहमदनगर टेंभुर्णी मार्गासाठी येत असलेल्या अडचणी बाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वीस वर्षापासून रखडला आहे. तसेच त्या भागातील जमिनींना नगर जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा या मागण्या दिसत आहेत. शेतकऱ्यांकडून विविध अडचणी मांडण्यात आल्या. यावेळी जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही. तोपर्यंत रस्ता करून देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी घेतली आहे.

यावेळी बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे व बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू होऊन अर्धा तास उलटला तरी मोजणी करणारे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित नसल्याने त्या ठिकाणी गोंधळ झाला.

मागील मोबदला अद्याप मिळाला नसल्याचे लोकांनी तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाकडे मागणी करणे अपेक्षित आहे. आमच्याकडे अद्याप पैशाचा आल्या नसेल तर आम्ही तुम्हाला कसा देऊ असे प्रतिउत्तर प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिले. यावेळी लोकांमध्ये रस्त्याच्या पूर्ण प्रक्रिये बाबत संताप व्यक्त केला जात आहे. तर जो क्रायटेरिया नगर जिल्ह्याला दिला आहे तोच करमाळा तालुक्याला ही मिळावा तरच आम्ही जमिनी देऊ अशी भूमिका सध्या सर्वांनी घेतली आहे. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील वरिष्ठांकडे पाठपुरावा करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे.