करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमसभा गरजेची ; पत्रकारदिनी ॲड हिरडे यांचे मार्गदर्शन

करमाळा समाचार

सर्व सामान्याची बाजू घेऊन बाजू मांडणारा पत्रकार असतो. ज्यावेळी सामान्यांची कामे होत नाहीत तोपर्यंत त्यांना उघडे पाडून त्याच्या प्रवृत्तीला ठेचणे हे पत्रकारांची काम असते. पत्रकार माणसाला खुर्चीवर बसवतो आणि उतरवण्याचे काम करतो असे पत्रकारांना मार्गदर्शन करताना बोलताना युवा पत्रकारांसाठी कार्यशाळा तर जनतेसाठी आमसभा घ्यावी अशी विनंती कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. बाबुराव हिरडे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे केली.

पत्रकार दिनानिमित्त करमाळ्यात विठ्ठल निवास येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. डॉ. बाबूराव हिरडे हे होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, अशोक नरसाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, राष्ट्रवादीचे अभिषेक आव्हाड व सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल उपस्थित होते. पत्रकार अण्णा काळे, अशोक मुरूमकर, विशाल घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.

पुढे बोलताना ॲड. हिरडे म्हणाले की, आमसभा म्हणजे काय तर प्रमुख अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक घेणे व त्यामध्ये सर्व जनतेचे कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्या अडचणी जाणून घेणे अशी आमसभा बरेच दिवस झाली झालेली नाही. तर ती घ्यावी आमसभेला कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. त्यामुळे ती घ्यायला काय हरकत नाही अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना आमदार संजयमामा म्हणाले, समाजात काम करत असताना कोणीतरी आमच्या उणीवा सांगितल्या पाहिजेत, त्या उणीवा सांगण्याचे काम पत्रकार करत आहेत. सर्वजण होयबा म्हणाले तर आमचाही कार्यक्रम लागायला वेळ लागणार नाही. मी प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेत असतो. त्यातुन काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. पत्रकार कायम जनतेचे प्रश्न मांडतात ते प्रश्न आम्ही जाणुन घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो असे सांगितले. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE