आर पी आय (गवई गटाचे) विजय भोसले यांच्या वडीलांचे निधन
करमाळा समाचार
आर,पी,आय ,गवई गटाचे माढा तालुका अध्यक्ष विजय भाऊराव भोसले यांचे वडील भाऊराव (तात्या) गुलाब भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे वय वर्ष 76 होते, त्यांचा अत्यंविधी इंदापूर येथे करण्यात आला, भाऊराव (तात्या) गुलाब भोसले हे भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांचे चुलते होते.

त्यांना राझणी भिमानगर इंदापूर पांडे, करमाळा आळसुंदे,या गावांमध्ये तात्या या नावाने ओळखले जात होते,त्यांचा स्वभाव, शांत संयमी मन मयाळु होता ,आणि तेवढाच रागीट तापड ही होता, त्यांना नेहमी खरे बोलणारी माणसे आवडायची खोटं बोलणं आवडतं नव्हंत त्यांच्याकडे अनेक चांगले गुण होते, ते कधीही कोणापुढे झुकले नाहीत, ते इंदापूर येथे दवाखान्यात १५ दिवस आजारांशी सामाना करत होते परंतु अचानक काळाने झडप मारली आणि तात्या आमच्या तुन काही क्षणात निघुन गेले आणि भोसले परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.
त्यांच्या जाण्याने भोसले परिवारावर कधीही भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली त्यांच्या मागे पत्नी, चार मुले चार सुना, एक मुलगी, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे,
