कंदर येथे ग्रामीण महिला स्वरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी – करमाळा समाचार
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलीत रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतामार्फत कंदर येथे ग्रामीण महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण महिलांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे तसेच महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
याठिकाणी कच्च्या केळीपासून वेफर्स तयार करण्याचे तसेच यापासून कश्याप्रकारे रोजगानिर्मिती होऊ शकते याबद्दल मोलाचे मार्गदर्शन कृषीदुत अमर मेहेर यांनी केले. कंदर परिसरामध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण महिला स्वयंरोजगारासाठी केळी वेफर्स हा उत्तम पर्याय आहे. मिळालेल्या प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर करून आम्ही स्वावलंबी बनू अशी प्रतिक्रिया याठिकाणी महिलांनी दिली. तसेच मिळालेल्या प्रशिक्षणा बद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विषय शिक्षक प्रा. एस. एम. एकतपुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष- मा.जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक- डाॅ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य- आर.जी. नलावडे , कार्यक्रम समन्वयक-प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी- प्रा. एस. आर. आडत, प्रा.डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाने कृषिदुत अमर मेहेर यांच्यामार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम कंदर येथे घेण्यात येत आहे.