स्नेहालय स्कूल मध्ये विदयार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत
करमाळा प्रतिनिधी
आज शाळेच्या पहिल्या दिवशी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विदयार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन व औक्षन करून शिक्षकांनी स्वागत केले. यावेळी पालक व शिक्षकांच्या हस्ते श्री गणपती व सरस्वती पूजन करण्यात आले.

तर स्नेहालय स्कूलच्या प्रिन्सिपल धनश्री दळवी यांनी प्रस्ताविकात म्हटले, विद्यार्थ्याचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे . यासाठी मराठी व इंग्लिश दोनीही भाषेचे समान शिक्षण देण्यावर आमचा प्रयत्न राहिल. तसेच विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहीजे आणि विविध खेळांमध्ये यश मिळाले पाहीजे यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करणार आहे अशी माहिती दळवी यांनी सांगितली.
यावेळी सीमा कोरडे,हेमा शिंदे,शिवांगी कांबळे,पल्लवी माळवे, राधा बगडे, कोमल बत्तीसे, सविता पवार, मन्सूर तांबोळी, अंकुश नाळे, संजय गोरे अदिंसह पालक, विदयार्थी, कर्मचारी मोठयासंख्येने उपस्थित होते.