शुल्लक वादातुन साधु महाराजाने लोकांवर उगारल्या तलवारी ; गावकऱ्यांनी लावले पळवुन
करमाळा समाचार
मंदीर परिसरात जनावरे चरण्यासाठी वाद सतत होता. त्यावरुनच महाराजाने एकाद दांडक्याने मारहाण केली. ही एक चुक त्या महाराजाला चांगलेच महागात पडले आहे. त्यातही लोक जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावरही तलवार उगारल्याने लोकाना राग अनावर झाला त्यावेळी मात्र महाराजाला पळावे लागले.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जांभळी शिवारातील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. शुक्रवारी एकादशीची दिंडी मंदिरात घेऊन जात असताना गणेशपुरी महाराज नावाच्या महाराजाने वाद घातला होता. दिंडीतील लोकांना दांडुक्याने मारहाण केली.

त्यानंतर आज सकाळी गावकरी आणि वारकऱ्यांनी या साधू महाराजाला जाब विचारण्यासाठी त्याचे घर गाठले.
मोठ्या संख्येनं गावकरी घराबाहेर जमल्यामुळे महाराज चांगलाच संतापला. गावकऱ्यांनी लोकांना दांडुक्याने का मारहाण केली, असे विचारले असता तेव्हा महाराज गावकाऱ्यांवर दोन हातात दोन तलवारी घेऊन अंगावर गेला.
‘पालघरमध्ये जे साधू सोबत केले ते माझ्यासोबत करण्याचा तुमच्या प्रयत्न आहे. समोर जर कुणी आलं तर सोडणार नाही’ अशी धमकीच या महाराजाने दिली.
‘तुम्ही महाराज आहात, आम्ही तुम्हाला कशाला मारणार, फक्त काल वाद का घातला हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत’ असं म्हणत गावकऱ्यांनी त्याची समजूत काढली. पण, महाराजाने कुणाचेही काही ऐकले नाही.
शेवटी गावकऱ्यांचा संताप बघून साधू महाराजांच्या पलायन केले. मात्र, पळताना महाराज जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.