साक्षीची आजारपणाशी झुंज अखेर संपली ; दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार
करमाळा समाचार
सावंत परिवारातील लाडकी साक्षी सचिन सावंत (वय 15) हिची आजारासोबत असलेली झुंज आज दि 7 रोजी अखेर संपली. वयाच्या पाचव्या वर्षापासून आजारी असलेली साक्षी घरात अतिशय लाडात वाढली होती. तीला फुफुसाचा त्रास होत असल्याचे निदान झाले होते. पण आज तागायत ती औषधांना व्यवस्थीत प्रतिसाद देत होती. सामान्य मुलांप्रमाणे ती घरात वावरत होती पण आज अचानक घरात खेळताना तिची शुद्ध हरपली व तिचे दुःखद निधन झाले आहे. सदरची वार्ता सर्वत्र पसरल्यानंतर सावंत परिवारासह शहरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.


साक्षी चा जन्म 2007 मध्ये झाला होता. लहानपणापासून तिला फुप्फुसाचा त्रास होता. परंतु तो लक्षात आलेला नव्हता. कालांतराने अधिक त्रास वाढला व तिला वयाच्या पाचव्या वर्षी दवाखान्यात नेल्यानंतर तिला फुफुसाचा त्रास असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर सावंत परिवारासह संपूर्ण पाहुणे व मित्र-मैत्रिणी तिचे लाड पुरवले व आजपर्यंत ती सर्वांच्या गळ्यातील ताईत म्हणून गल्लीत वावरत होती. पण आज अचानक ती सोडून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साक्षीही येथील कर्मवीर अण्णासाहेब विद्यालयात शिक्षण घेत होती. करमाळा जामखेड रस्त्यावर असलेल्या सावंत फार्म हाऊस या ठिकाणी तिच्यावर चार वाजता अंत्यविधी होणार आहे. साक्षी ही विठ्ठल आप्पा सावंत यांची नात तर सावंत गटाचे नेते सुनिल सावंत व नगरसेवक संजय सावंत, पंचायत समीती सदस्य ॲड. राहुल सावंत यांची पुतणी होत.