कुल्फी विकल्याप्रमाणे उघडपणे अवैध दारुची विक्री ; ग्रामस्थ संतप्त
प्रतिनिधी वाशिंबे – (सुयोग झोळ)
दिवेगव्हान ता. करमाळा येथे अवैध मार्गाने देशी दारू गावांमध्ये खुलेआम विकण्यात येते. त्यामुळे गावातील तरुण आणि शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दारूच्या आहारी जात आहेत.

विशेष म्हणजे ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यामुळे तोडणी कामगारांच्या वस्ती वर जाऊन आईस्क्रीम कुल्फी जशा पद्धतीने विकली जाते त्या पद्धतीने दारुची विक्री करण्यात येतआहे. करमाळा, कोर्टी, केतूर, राशीन येथून देशी दारूचे बाँक्स गावात दारू विक्री साठी आणण्यात येत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाला वारंवार माहीती देऊन ही दूर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तात्काळ दारू बंद करण्याची मागणी शंभर नागरीकांच्या सह्यांच्या निवेदनाद्वारे केली. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
