करमाळ्यासह आठ तालुक्यात झालेल्या चोऱ्यांचे धागेदोरे माळशिरस तालुक्यात ; करमाळा, माढा, अकलुजसह इतर ठिकाणी 11 गुन्हे दाखल

समाचार टीम –

करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील साई कृषी सेवा केंद्र मध्ये 9 जून ते 11 जून दरम्यान दुकानाचे लोखंडी शटर उत्कटून आज प्रवेश करून सबमर्सिबल मोटारीचे चार कॉपर केबल बंडल, एक लॅपटॉप, लहान कॉपर बंडल, दोन मोबाईल असा एकूण एक लाख पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लबाडीने चोरी करून नेला होता. त्या प्रकरणासह इतर अकरा प्रकरणातील चोर मिळून आले आहेत. त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे माळशिरस तालुक्यात मिळून आले आहेत.

या सर्व चोऱ्या करमाळा, टेंभुर्णी, कुर्डूवाडी, वेळापूर, पंढरपूर शहर, मोहोळ, नातेपुते, सांगोला या भागात घडलेल्या आहेत. तर या प्रकरणी त्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सदर प्रकरणात संशयित म्हणून अमोल पवार रा. सवतगव्हाण ता. माळशिरस, दिगंबर माने रा. अकलूज, शशिकांत पवार. जुना बैल बाजार अकलूज या तिघांना अटक केली आहे. तर विजय काळे बाबरी पुल,अकलूज गोपी चव्हाण सवतगव्हाण, दत्तू चव्हाण, सवतगव्हाण सुरेश चव्हाण, सवतगव्हाण आदी फरार आहेत.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून या सर्व ठिकाणी कॉपर वायर दुकान उचकटून चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वि सातपुते यांनी गुन्हे उघडकीस आणणे कामी आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुहास जगताप l, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानीक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांचे पथकास सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

सदरचे पथक गुन्हे उघडकीस आणणे कामी मागावर असताना त्यांना माहिती मिळाली. सवतगव्हाण तालुका माळशिरस व अकलुज शहरांमध्ये कॉपर वायरचे गुन्हे करणारी गुन्हेगारांची टोळी कार्यरत आहे. ते गुन्हे करण्यासाठी अकलूज शहरातील पिकप वाहनाचा वापर करत असल्याबाबत माहिती मिळाली. सदर गुन्ह्याच्या तपासणी पथक अकलूज भागात असताना टोळीतील एक सदस्य अकलूज शहरातील जुना बस स्टॅन्ड समोरील चहा टपरीवर थांबला असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले.

संशयीताला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर संशयीताने सर्व माहिती दिली. यावेळी काही साथीदारासोबत मिळून संबंधित तालुक्यांमध्ये चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. त्यावरून इतर साथीदारांचा शोध घेत असताना गुंह्यात वापरलेले वाहन व त्यांचा साथीदार या दोघांची माहिती काढून त्यांना ही गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 530 किलो वजनाचे कॉपर वायर, एक मोटरसायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले पिकप बोलेरो वाहन असा एकूण बारा लाख 26 हजार 742 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
DMCA.com Protection Status