करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

सालगड्याने दिड लाखाचा सोन्याचा ऐवज लाबंवला

करमाळा: तालुका प्रतिनिधी


तालुक्यातील खडकी येथे चक्क शेतातील सालगड्यानेच घरात चोरी करून मालकाचे घरातील दीड लाख रुपयाचे सोन्याचे ऐवज चोरून पोबरा केला आहे. रमेश धोंडीबा डोंगरे रा. वाई (मेंढी) तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सुरेश सिताराम शिंदे (वय 55) रा. खडकी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. श्री शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी शेतात काम करण्यासाठी वाई येथील रमेश डोंगरे याला एक लाख 5 हजार रुपये च्या मोबदल्यात सालाने कामावर ठेवले होते.

दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरेश शिंदे हे जातेगाव येथील वारे वस्तीवर कीर्तनासाठी गेले होते. पत्नी ही मुलाचे लग्न करायचे असल्याने बस्ता बाधंण्यासाठी पुणे येथे गेली होती. त्यावेळेस जाताना त्यांनी सालगडी रमेश डोगंरे याला घराकडे लक्ष देण्यासाठी शेतमालक शिंदे यांनी सांगून व घराला कुलुप लावून ते कीर्तनाला गेले होते . दुपारी एक वाजण्याची सुमारास ते किर्तनावरून घरी परत आल्यानंतर त्यांना घर उघडे दिसले.

ads

यावेळी घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाटातील एक लाख वीस हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस व तीस हजार रुपयांचे सोन्याचे कानातील कर्ण फुले सात ग्रॅम वजनाचे असे एकूण दीड लाख रुपयाचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. यावेळेस त्यांनी रमेश डोंगरे यांना शोधले असता तो आढळून आला नाही.

तो पळून गेल्याचे खात्री झाल्यामुळे त्यांनी करमाळा पोलिसात एक लाख पन्नास हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा सालगड्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी भादवि कलम 381नुसार सालगड्यावर गुन्हा दाखल केला असून हवालदार मारूती रणदिवे पुढील तपास करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE