करमाळाराजकीयसोलापूर जिल्हा

तीस ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायती अविरोधच्या मार्गावर ; ग्रामपंचायतनिहाय आलेले अर्ज

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीत निवडणुक जाहीर झालेली आहे. त्यामध्ये २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अर्ज भरण्याची मुदत होती. अखेरच्या दिवशी ऑफलाईन अर्ज भरण्याचे असल्याने इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला होता. अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी ७८ तर सदस्य पदाला ३८७ अर्ज आले आहेत.

तर एकुण सरपंच पदाला १३५ व सदस्य पदासाठी ६२५ अर्ज दाखल झाले आहेत. तीस पैकी अंजनडोह, लिंबेवाडी यागावात सरपंच पदासाठी एकच अर्ज आलेला आहे. तर पोमलवाडी, रिटेवाडी, मांजरगाव, अंजनडोह, वंजारवाडी, लिंबेवाडी, खातगाव या गावातील चित्र छाननी दिवशी स्पष्ट होईल.

तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीसाठी पंचायत समीती हॉल मध्ये अर्ज स्विकारण्यात आले. यावेळी सनियंत्रण अधिकारी तहसिलदार समीर माने , नायब तहसिलदार विजयकुमार जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. इच्छुकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केलेली होती तर पंधरा टेबल च्या माध्यमातून अर्ज स्विकारण्यात आले.

तीस ग्रामपंचायती मधुन एकुण २४४ सदस्य रिंगणात असणार आहेत. ९० तीस गावात ९० प्रभागातुन सदर निवडणुक होत आहे. तर चार ग्रामपंचायती मध्ये सदस्या येवढेच अर्ज आले आहेत. खरी परिस्थिती सोमवारी छाननी दिवशी स्पष्ट होणार आहे.

गावाप्रमाणे सदस्य अर्ज व कंसात सरपंच पदाचे उमेदवार ..
वरकटणे ४१ ( ४ ), कात्रज १४ (४), गोयेगाव ४ ( १६), हिंगणी २५ (७), पोमलवाडी १० (२), रिटेवाडी ७ (५ ), शेलगाव वां ४१ (११), जिंती २९ (४), मांजरगाव ७ (३), पोंधवडी २५ (४ ), कोंढारचिंचोली २२ (५), वाशिंबे ३६ (१०), अंजनडोह ११ (१), वंजारवाडी १० (३ ), कुंभारगाव २३ (३), कामोणे २७ (४ ), दहिगाव ३ (२४), देलवडी १६(३), दिव्हेगव्हाण ३३ (४), तरटगाव २१ (३), मोरवड २३ (८), लिंबेवाडी ७ (१), खडकी १४ (५), सोगाव २४ (४), विहाळ २५ (२), भिलारवाडी २४ (४), खातगाव ११ (४), पोफळज २०(८), पारेवाडी २३(४), टाकळी रा. १६(८).

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE