करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यातील संजय शेटे यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

करमाळा समाचार

: शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य (शाखा सोलापूर) यांच्या जिल्हा कार्यकारिणी निवडणूक 2026 मध्ये करमाळा तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटनेचे अध्यक्ष संजय वसंतराव शेटे यांची जिल्हा अध्यक्षपदी सलग दुसऱ्या वेळेस बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सदर निवडणूक प्रक्रियेनुसार विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र अध्यक्ष पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने संजय शेटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी शिवाजी माने, सचिवपदी आण्णासाहेब बिभीषण नटवे, सहसचिवपदी सावता श्रीकृष्ण गोरे तर कोषाध्यक्षपदी मुझावर जावेद साहेब यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते 28 मार्च 2026 रोजी ही घोषणा करण्यात आली. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात संघटनेच्या कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE