करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हा

नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा जिल्हा प्रशासन अधिकारी डाॅ.पंकज जावळे यांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा नगरपरीषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा-२०२० मध्ये स्वच्छते विषयक केलेल्या विवीध उपक्रमांच्या जोरावर जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा २०२० मध्ये ‘ क ‘ वर्ग नगरपरीषदांमध्ये सोलापूर जिल्ह्यातुन करमाळा नगरपरीषदेचा प्रथम क्रमांक, महाराष्ट्र राज्यात २२ वा तर पश्चिम भारत झोन मध्ये २९ वा क्रमांक पटकावून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याकामी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी प्रसंगी टिकाव -फावडे हातात घेवून, नगरपालिकेच्या नगरसेवक व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून स्वतःला झोकून देत शहर स्वच्छतेचे काम केले. स्वतःची ‘स्वच्छतादूत ‘ म्हणुन ओळख निर्माण केली. त्यांच्या या उल्लेखनिय कामगीरी बद्दल व यशाबद्दल सोलापूर जिल्हा नगर प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे यांनी कामाचे कौतुक करत समतेचा संदेश देणारे गौतम बुद्धांची प्रतिमा भेट देवून नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी डाॅ. जावळे यांनी मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार व सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी व विशेष करून सर्व करमाळा शहरवासीयांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या योगदानामुळे नगरपरीषद हे यश प्राप्त करू शकली असेच यश मिळावे या करिता सदिच्छा दिल्या. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब लबडे, बाळुशेठ बलदोटा, बाळासाहेब कांबळे, पप्पू ओहोळ, अॅड घोगरे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE