सातोली जिल्हा परिषद शाळेला मिळाला शिक्षक भाजपाचे अमरजीत साळुंखे यांच्या प्रयत्नांना यश
करमाळा समाचार
मौजे सातोली तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग होते पटसंख्या ही ९५ पर्यंत होती. या वर्ग व पट संख्येत आता बदल झाला आहे. या पट संख्येला फक्त दोन शिक्षक शिकवत होते. त्यातील एक शिक्षक मुख्याध्यापक असून दुसऱ्या शिक्षक हे सहशिक्षक आहेत. शाळेची पटसंख्या पाहता आणखीन दोन शिक्षकांची अत्यंत गरज होती.

भाजपा नेते अमरजित साळुंके यांनी वेळोवेळी दि. २३/६/२०२३ व दि.४/८/२०२३ रोजी लेखी पत्रा द्वारे जिल्हापरषदेच्या शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांचेकडे शिक्षकांची मागणी केलेली होती, त्यापूर्वी दोन वर्षे तोंडी मागणी केली होती परंतु अद्याप पर्यंत एकही शिक्षक सातोली शाळेला मिळालेला नव्हता.

जर सातोली शाळेला शिक्षक मिळाला नाही तर शाळेला कुलूप लावून शाळा बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.
परंतू भाजपा नेते अमरजित साळुंके यांनी पत्रा द्वारे केलेल्या शिक्षक मागणीची दखल घेऊन प्रशासनाने शाळेला एक शिक्षक उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.