करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाकरे शिवसेनेकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन

जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा लोकहिताचा उपक्रम!

ठाणे:- धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

27 ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन या वेळेत सदर शिबिर शिवसेना चंदनवाडी शाखा व शिवसेना शाखा रामचंद्र नगर नं 2, संभाजी नगर येथे पार पडणार आहे.या शिबिरात मोफत रक्तदाब तपासणी, मोफत शुगर तपासणी, मोफत हृदय विकार तज्ञ मार्गदर्शन, मोफत टू डी इको, मोफत इसीजी तपासणी, मोफत ट्रेस टेस्ट, मोफत अस्थिविकार तज्ञ मार्गदर्शन, मोफत मूत्रविकार तज्ञ मार्गदर्शन, मोफत सामान्य विकार तज्ञ मार्गदर्शन, मोफत नेत्र चिकित्सा,मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात मोफत एन्जोग्राफी, मोफत एन्जोप्लास्टी, मोफत बायपास सर्जरी, मोफत रेटणा सर्जरी,मोफत कॅन्सर सर्जरी,मोफत एवेस्टिंग इंजेक्शन, मोफत किडनी स्टोन सर्जरी, मोफत थायरॉईड सर्जरी,मोफत लहान मुलांचे तिरळेपणा शस्त्रक्रिया इत्यादी आजारांवर उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे.

शिबिरामध्ये येताना जुने रिपोर्ट तसेच केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन येणे बंधनकारक राहील असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.सदर महाआरोग्य शिबिर जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, राम काळे, मिलिंद मोरे, वसंत गव्हाळे, जीवाजी कदम, तानाजी कदम,धोंडीराम मोरे,संजय भोसले,भास्कर शिर्के,अशोक कदम, सुचिताताई धुरी जयदीप जाधव संजय दळवी तुषार चाळके आदी काम पाहणार आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE