E-Paperकरमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

वीजेच्या धक्क्यात सातोलीच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू ; फोटो विचलीत करु शकतात

करमाळा समाचार 

सचिन सदाशिव साळुंखे वय 31 यांचा आज दुपारी कंदर येथे इलेक्ट्रिक डीपीवर काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला आहे. सचिन साळुंखे हा कंदर सब स्टेशनला कॉन्ट्रॅक्ट बेस वर कामाला होता आज शनिवार रोजी दुपारी दोन वाजता माने यांच्या शेतातील कंदर बिटरगाव या लाईनवरील विद्युत ट्रांसफार्मर दुरुस्त करण्यासाठी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परमिट घेऊन तो ट्रान्सफर दुरुस्तीसाठी शेतात गेला होता

लाईट नसल्याची खात्री करून तो ट्रान्सफॉर्मर वर चढला असता अचानक लाईट सुरु झाली व मेन लाईन चा शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला या मृत्युस कारणीभूत असलेल्या ऑपरेटर जूनियर इंजीनियर या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची उपस्थित नागरिकांनी मागणी केली. तोपर्यंत मृतदेह खाली काढू देत नाही असा आग्रह धरला. यानंतर यावेळी उप अभियंता गव्हाणे हजर झाले.

यावेळी सातोलीचे माजी सरपंच आबासाहेब साळुंखे व शंभूराजे जगताप आदि नागरिक व अधिकारी यांनी समन्वय साधत दोशी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उरवण्यात आला व पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद करमाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम चालु आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE