E-Paper

बीड मनसे पदाधिकाऱ्याचे भर चौकातुन अपहरण ; तीन दिवसानंतरही थांगपत्ता नाही

करमाळा समाचार 

मनसेचे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष सोपान प्रभाकर मोरे यांचं शिरूर येथील राक्षसभुवन चौकातून अपहरण केले आहे. तरी अद्यापही त्यांचा पत्ता लागत नसल्याने मनसे आता आक्रमक पवित्रा घेत आहे. लवकरात लवकर शोध घ्या अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

सोपान काका मोरे हे मनसे शेतकरी तालुका अध्यक्ष आहे. तर त्यांचा कंस्ट्रक्शनचा व्यवसायही आहे. सामाजिक कार्य तसेच व्यवसायातील त्यांची प्रगती बघता त्यांचे विरोधक ही असणे अपेक्षित आहे. अशातच त्यांचा मुख्य चौकातून सकाळी नऊच्या सुमारास अपहरण झाले. त्यांना शिरूर मधील राक्षसभवन चौकातून अपहरण करून ती गाडी डोंगर किनी रोड ने गेले आहे. त्याचबरोबर सोपान मोरे यांची स्विफ्ट डिझायर पांढरा कलरची
एम एच 05 AJ झिरो 9433 या क्रमांकाची गाडीही सोबतच आहे.

अपहरण करून नेणाऱ्या अज्ञात लोकांनी निसान टेरेनो या चार चाकी गाडी मध्ये त्यांचे अपहरण केले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहे. तरी या बाबत कोणाला माहिती मिळाल्यास खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालय – 02442 222333
02442 222666
शिरुर पोलीस स्टेशन – 02444 259539
अंमळनेर पोलीस स्टेशन -02444 241533
सचिन भस्मारे – 9823315006
8087672555
कृष्णा जाधव. – 7057747355

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE