करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

धडकी भरवणाऱ्या आवाजामुळे करमाळा शहरात भितीचे वातावरण ; नेमके कारण आले समोर

करमाळा समाचार – नाना घोलप

रात्री अकराच्या सुमारास अचानक मोठा धमाका झाला व जोराचा आवाज सुरू झाला. सर्वत्र धडकी भरवणारा हा आवाज कशाचा होता असा प्रत्येकालाच प्रश्न पडला. याबाबत माहिती घेतली असता देवीचे माळ परिसरातील कमलाई कारखान्यावर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणचा सदरचा आवाज होता. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. जवळपास पंधरा मिनिटे सदरचा आवाज सुरू असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

अचानक सुरू झालेला आवाज एखाद्या धमक्यासारखा सुरू झाला. पण तो धमाका नसून अचानक सुरू करण्यात आलेला ब्लोअर होता. त्याचा आवाज एवढा मोठा होता की पाच ते सहा किमी पर्यंत एखादे विमान जवळून गेल्यागत आवाज येत होता. यामुळे गावातील लोक बाहेर येऊन आभाळाकडे पाहत होते पण तिथे काहीच दिसले नाही.

कारखान्याच्या एका मशीनमध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली होती. यावेळी त्याला प्रेशर दिल्यामुळे सदरचा आवाज आल्याची माहिती कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले आहे. आता हा आवाज बंद झाला असून पुन्हा येणार नसल्याचे ही माहिती त्यांनी दिली आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE